मौनी रूपेरी पडद्यावर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

छोट्या पडद्यावर "नागीन' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

तसं तर ती चित्रपटात काम करणार असल्याचं बऱ्याच कालावधीपासून बोललं जात होतं. मात्र आता शिक्कामोर्तब झालंय की, ती बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार मौनी अक्षयकुमारसोबत "गोल्ड' चित्रपटात दिसणार आहे.

रितेश सिदवानी आणि फरहान अख्तर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रीमा काग्ती करणार आहे. "गोल्ड' चित्रपटाची कथा 1948 च्या दरम्यानची असून तेव्हा भारताने पहिलं ऑलिंपिक मेडल जिंकलं होतं. या चित्रपटातील मौनीचा वेगळा अंदाज आणि तिची रुपेरी पडद्यावरची कमाल बघण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.