कान्समध्ये भारतीय अभिनेत्रींच्या नावाचा घोळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स महोत्सवासाठी दीपिका पडुकोण, सोनम कपूर, ऐश्‍वर्या राय आदी तारका उपस्थित आहेत. यांच्या नावावरून तेथील मीडियामध्ये सध्या बराच गोंधळ सुरू आहे. तेथे सोनमला दीपिका तर दीपिकाला प्रियांका म्हणून संबोधले जात आहे.

पॅरीस: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स महोत्सवासाठी दीपिका पडुकोण, सोनम कपूर, ऐश्‍वर्या राय आदी तारका उपस्थित आहेत. यांच्या नावावरून तेथील मीडियामध्ये सध्या बराच गोंधळ सुरू आहे. तेथे सोनमला दीपिका तर दीपिकाला प्रियांका म्हणून संबोधले जात आहे. 

कान्सला आपल्याकडील अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली. त्यांची एक छबी मिळवण्यासाठी अनेक फोटाग्राफर्स दबा धरून असतात. त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर फोटो कॅप्शनमध्ये नाव टाकायची ज्यावेळी वेळ येते, त्यावेळी मात्र हा नावांचा घोळ होतो. कान्ससाठी फोटो पुरवणाऱ्या एका एजन्सीने सोनमला दीपिका संबोधले. तर एका पेपरने दीपिकाला प्रियांका असे म्हटले आहे. 

बेवॉच'मुळे तिकडे प्रियांकाची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे तिचे फोटो मिळवण्यासाठी सर्वात जास्त चढाओढ असते.