दमनप्रीतसिंगचं ऑन-ऑफ स्क्रीन ट्रेनिंग 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

लाईफ ओके वाहिनीवरील ऐतिहासिक मालिका "शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंग'मध्ये बालपणीच्या रणजितसिंगची भूमिका साकारणारा दमनप्रीतसिंग सध्या मार्शल आर्टस्‌चे ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन प्रशिक्षण घेतो आहे. या मालिकेत वीरसिंगची भूमिका साकारणाऱ्या माखनसिंग यांच्याकडून तो मार्शल आर्टस्‌चे धडे गिरवीत आहे. माखनसिंग हे मार्शल आर्टस्‌चे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. या मालिकेत ते रणजितसिंगचे शिक्षक योद्धाजीची भूमिका निभावत असून रणजितसिंगला साऱ्या लष्करी कलांचे प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे दमनप्रीतसिंग केवळ पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागेही त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेतोय. 