डेमीचा ताण वाढला अन दात पडला

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

हाॅलिवूड अभिनेत्री डेमी मूर बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण काही तासांपूर्वी डेमीने एक फोटो सोशल साईटवर टाकला आहे. यात ती हसत असून त्यात तिचा पुढचा एक दात पडल्याचे तिने सांगितले आहे. हा दात अति ताणामुळे पडल्याचे सांगत, अमेरिकेतील ताणाचे प्रमाणण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

न्यूयाॅर्क : हाॅलिवूड अभिनेत्री डेमी मूर बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण काही तासांपूर्वी डेमीने एक फोटो सोशल साईटवर टाकला आहे. यात ती हसत असून त्यात तिचा पुढचा एक दात पडल्याचे तिने सांगितले आहे. हा दात अति ताणामुळे पडल्याचे सांगत, अमेरिकेतील ताणाचे प्रमाणण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

एककाळ डेमीच्या मादक सौंदर्यांने तुफान गाजवला. आता फारशी चर्चेत नसलेली डेमी या फोटोबद्दल बोलताना म्हणते, माझे दोन दात पडले. याचे सर्व श्रेय मी ताणाला देते. तिच्या या फोटोमुळे अमेरिकेतील ताण पुन्हा प्रकाशात आला आहे.