हॉलीवूडपटात धनुष 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि साऊथ स्टार धनुषने "रांझना' व "शमिताभ' चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली.

"रांझना' कमर्शिअली हिट ठरला असला तरी "शमिताभ'ची पाटी तशी कोरीच राहिली. दोन्ही चित्रपटांतील धनुषच्या कामाची मात्र तारीफ झाली. बॉलीवूडमध्ये त्याची चर्चा रंगली. त्याच्या "कोलावरी डी...' गाण्याने आधीच धुमाकूळ घातला होता. ते गाणे खूपच लोकप्रिय झाले. आता धनुषला हॉलीवूड खुणावतेय. हॉलीवूडसाठी तो सज्ज झालाय.

"द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' असे हॉलीवूडपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी धनुष मुंबईच्या रस्त्यावर दिसला होता. लेखक रोमान पोर्टुलास लिखित प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. त्याचे चित्रीकरण मुंबई, पॅरिस, ब्रुसेल्स व रोममध्ये होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केन स्कॉट करताहेत. एका मुलाखतीदरम्यान केन स्कॉट म्हणाले, "धनुष उत्तम कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे खूप मोठी गोष्ट आहे.' हॉलीवूडपटात धनुषसोबत एरिन मारिआर्टी, सीमा बिस्वास आणि लौरेन लफिट हे कलाकार आहेत. धनुष हॉलीवूडमध्ये काय कमाल दाखवतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.