डायना करणार ऍक्‍शन 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

'कॉकटेल'मधील साधी-भोळी मीरा ते "हॅप्पी भाग जायेगी'मधील बिनधास्त हॅप्पीची भूमिका करणाऱ्या डायना पेन्टी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

ती लवकरच ऍक्‍शन चित्रपटात दिसणार आहे. 1998मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीवर आधारित असलेल्या या चित्रपटात जॉन इब्राहिमचीही भूमिका आहे. या चित्रपटाचे नाव निश्‍चित झालेले नाही. सध्या "शांतीवन' असे तात्पुरते नाव ठेवण्यात आले आहे.

डायनाने नुकताच या चित्रपटासाठी करार केला. याबाबत ती म्हणाली, "चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर लगेचच मी होकार दिला. सत्यघटना चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा अधिक काहीही चांगले असू शकत नाही. मला नेहमीच वेगळे करायची इच्छा असते. ती संधी मला या निमित्ताने मिळाली.'