दिव्या दत्ता टेड एक्‍समध्ये 

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

दिव्या दत्ताने आजपर्यंत ज्या प्रकारच्या भूमिका चित्रपटात केलेल्या आहेत त्यावरून ती आपल्या अभिनयात कमालीची निपुण असल्याचे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. "भाग मिल्खा भाग' असो वा "इरादा'. या चित्रपटांमध्ये ती प्रमुख भूमिकेत नसली, तरीही तिने अभिनयाद्वारे आपली वेगळी मोहोर उठवली आहे. 
दिव्या दत्ताला "टेड एक्‍स' या टॉक शोसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या वेळी ती तिच्या करिअरविषयीची माहिती देणार आहे. 

टेड एक्‍स या शोमध्ये प्रेक्षकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास ऐकायला मिळेल. या अनुषंगाने कार्यक्रमाची रचना आहे. 
टेड एक्‍सची ही परिषद या महिन्यात दिल्लीत होणार आहे. दिव्या दत्ता म्हणते, "या शोमध्ये माझी लहान गावातून स्टारडमपर्यंत झालेली वाटचाल प्रेक्षकांना सांगणार आहे.'