डोण्ट बी ओव्हर स्मार्ट! 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

गेले काही दिवस "जुडवा 2' बद्दल बॉलीवूडमध्ये भलतीच चर्चा रंगली आहे. पहिलं कोण या चित्रपटात काम करणार? इथपासून सलमानचं त्याबद्दलचं मत, इथपर्यंत. आता म्हणे सलमानने वरुणला या चित्रपटासंदर्भात एक सल्ला दिला आहे. जवळजवळ 20 वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक होत आहे. सलमानने या चित्रपटात डबल रोल केला होता आणि हा चित्रपट भलताच सुपरहिट ठरला होता. साधा सरळ प्रेम आणि टपोरी राजा या दोन भूमिका सलमानने निभावल्या होत्या. आता त्याची जागा वरुणने घेतली म्हटल्यावर साहजिकच सलमानने त्याला काही सल्ले दिले असणार.

गेले काही दिवस "जुडवा 2' बद्दल बॉलीवूडमध्ये भलतीच चर्चा रंगली आहे. पहिलं कोण या चित्रपटात काम करणार? इथपासून सलमानचं त्याबद्दलचं मत, इथपर्यंत. आता म्हणे सलमानने वरुणला या चित्रपटासंदर्भात एक सल्ला दिला आहे. जवळजवळ 20 वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक होत आहे. सलमानने या चित्रपटात डबल रोल केला होता आणि हा चित्रपट भलताच सुपरहिट ठरला होता. साधा सरळ प्रेम आणि टपोरी राजा या दोन भूमिका सलमानने निभावल्या होत्या. आता त्याची जागा वरुणने घेतली म्हटल्यावर साहजिकच सलमानने त्याला काही सल्ले दिले असणार. वरुणला त्याबद्दल विचारल्यावर वरुण म्हणतो, "मला सलमानने एकच सांगितलं, ओव्हरस्मार्टगिरी न करता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजेच माझ्या वडिलांनी जे सांगितलं आहे, ते ऐकायचं.' तो पुढे म्हणतो, "जेव्हा "जुडवा' रिलीज झाला तेव्हा मी खूप छोटा होतो. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगसाठी जेव्हा मी गेलो तेव्हा पहिल्यांदा सलमान खानला भेटलो होतो. बाकी मी लहान होतो; त्यामुळे मला फारसं काही आठवत नाही.' एवढ्या सगळ्या बोलबाल्यानंतर वरुणचा "जुडवा 2' मध्ये जलवा बघायला सगळ्यांना नक्कीच आवडेल. वरुण, तुला सलमानने दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्यासाठी ऑल द बेस्ट. 

Web Title: dont be over smart