अ.भा. नाट्यपरिषदेतर्फे बालनाट्य लेखन स्पर्धेचे आयोजन

टीम ई सकाळ
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

२०१६ मध्ये बालदिनानिमित्त नाट्य परिषदेने बालनाट्य महोत्सव आयोजित केला होता. या सोहळ्यात बालनाट्य लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावर्षीच्या बालनाट्य लेखन स्पर्धेसाठी नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य संहिता मागविण्यात येत आहेत.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य संमेलनाध्यक्षा मा.सौ. कांचन सोनटक्के यांच्या पुढाकाराने परिषदेतर्फे प्रथमच बालनाट्य लेखन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील ५५ लेखकांनी बालनाट्य संहिता सदर स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या.

२०१६ मध्ये बालदिनानिमित्त नाट्य परिषदेने बालनाट्य महोत्सव आयोजित केला होता. या सोहळ्यात बालनाट्य लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावर्षीच्या बालनाट्य लेखन स्पर्धेसाठी नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य संहिता मागविण्यात येत आहेत.

सदर स्पर्धेचे नियम व अटी खाली देण्यात आल्या आहेत. 

बालनाट्य संहिता पाठवण्याची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत वाढवली असून, संहिता अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या, मुंबई कार्यालयात पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ७ या वेळेत  फोन.नं. ०२२-२४३००५९४, ०२२-२४३७७६४९ येथे संपर्क साधावा.
 
 
 -: नियम व अटी :-
 
१)               बालनाट्य लेखन ४० ते ५० मिनिटांच्या सादरीकरणासाठी असावे. (हस्त / टंकलिखित)
२)               आशय -  विषयाची मांडणी व कथानक ५ ते १२ हया वयोगटासाठी अनुकूल व पोषक असावे.
                   (पालक, शिक्षक व मोठ्या व्यक्तींचे प्रबोधन करणारे विषय नसावे.)
३)               बालनाट्य संहिता ही पूर्णपणे नवीन असावी. सदर बालनाट्याचा प्रयोग हया पूर्वी कोठेही झालेला नसावा.
४)               स्पर्धेचा निकाल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल. त्यासाठी
                   स्पर्धकांशी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
५)               परिक्षकांचा निर्णय स्पर्धकांना / सर्वांना बंधनकारक राहील.
६)               बालनाट्य संहिता पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१७ असून संहिता ३ प्रती खालील   
                   पत्यावर पाठवाव्यात. अंतिम तारखेनंतर आलेल्या संहितांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही.
                   पत्ता – अ.भा.मराठी नाट्य परिषद, यशवंत नाट्य मंदिर,
                   मनमाला टँक रोड, दादर-माटुंगा रोड, मुंबई ४०००१६  फोन नं. ०२२-२४३००५९४
७)               सर्वोत्कृष्ट दहा बालनाटीकांचा संग्रह पुस्तक रूपाने, परिषदेच्या नावे, प्रकाशित केला जाईल.
८)               प्रकाशनाचे सर्व हक्क परिषदेकडे राहतील.
९)               ह्यासाठी पारितोषिका व्यतिरिक्त, परिषदेतर्फे लेखकास कोणतेही मानधन दिले जाणार नाही.
१०)            नाट्य परिषदेचे सभासद असणे स्पर्धकावर बंधनकारक नाही.
११)            सदर बालनाट्याचा प्रयोग कोणासही करायचा असल्यास लेखकाची परवानगी आणि त्याचे मानधन आवश्यक
                   आहे.
 
v पारितोषिकांचा तपशील खालील प्रमाणे
·       प्रथम क्रमांक – रोख रु. ७०००/-
·       द्वितीय क्रमांक – रोख रु. ५०००/-
·       तृतिय क्रमांक - रोख रु. ३०००/-
 
हया व्यतिरिक्त उत्तेजनार्थ सात पारितोषिके प्रत्येकी रु.१०००/- ची देण्यात येतील. 

Web Title: Drama writing natyaparishad esakal news