'दुहेरी' मालिकेत सुनील तावडेंचा नर्सचा अवतार

टीम ई सकाळ
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेमुळे  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देताना त्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनी एक नवे आव्हान स्वीकारले असून  यापुढे ते नर्सच्या रुपात दिसणार आहेत. या नव्या रुपामागे काही कारस्थान आहे का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. “

मुंबई : अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेमुळे  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देताना त्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनी एक नवे आव्हान स्वीकारले असून  यापुढे ते नर्सच्या रुपात दिसणार आहेत. या नव्या रुपामागे काही कारस्थान आहे का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. “
 
तावडे म्हणतात, "परसू वेगळा वाटण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. त्याचं हसणं वेगळं, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी, किंवा त्याची लकबही वेगळी वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं मी हॉलिवूड अभिनेता हिथ लेजरची 'द डार्क नाईट' या चित्रपटातील जोकरच्या भूमिकेचा अभ्यास केला." 'द डार्क नाईट' मध्ये जोकरचा नर्सच्या वेशातील एक सीन प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
 
तावडे यांनी सोशल मीडियामध्ये नर्सच्या गेटअपमधली फोटो नुकताच शेअर केला आहे. नर्सचे कपडे, अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली असलेला हा फोटो आहे. या फोटोला त्यांच्या चाहत्यांची मोठी दाद मिळाली असून, हजारो लाईक्स मिळाले आहेत. कारस्थानी परसूनं गेटअप बदलून काहीतरी चाल खेळली आहे.