एमाची आठ वेळा स्क्रिन टेस्ट! 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

जेव्हा हर्मायनी ग्रेंजर हॅरी पॉटरच्या चौथ्या म्हणजेच गॉब्लेट ऑफ फायर या भागात बॉल डान्ससाठी तिच्या गुलाबी गाऊनमध्ये आली तेव्हा तमाम हॅरी पॉटर फॅन्सना ती खूप सुंदर आहे हे कळलेच होते. हॅरी पॉटर ही सिरीजच अशी होती की आठ भागांमध्ये अल्बस डंबलडोअर सोडून कोणतेही मुख्य पात्र बदललेले नव्हते. त्यामुळे हॅरी नऊ वर्षांचा असताना त्याच्या प्रवासाबरोबरच आजची तरुण पिढी मोठी होत गेली.

फक्त हॅरीनेच नाही तर हर्मायनी ग्रेंजर म्हणजेच एमा व्हॉटसननेही सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. तिची हुशारी, तत्परता आणि हॅरीशी मैत्री आणि एक कर्तबगार जादूगारीण असल्याचे तिने तिच्या या पात्रातून अगदी लोकांना पटवून दिले होते; पण हेच पात्र करण्यासाठी एमाला तब्बल आठ वेळा ऑडिशन द्यावी लागली होती. हॅरी पॉटर या सीरिजची लेखिका जे. के. रोलिंगने एकदा म्हटलं होतं की, हर्मायनीचे पात्र तिने काहीसे तिच्यावर आधारित लिहिले होते. त्यामुळे हॅरी पॉटरच्या ऑडिशनला जेव्हा पहिल्यांदा एमाने स्क्रिन टेस्ट दिली तेव्हाच तिला एमा, हर्मायनी म्हणून आवडली होती; पण बाकीच्यांच्या समाधानासाठी जे. के. रोलिंगने एमाच्या आणखी काही स्क्रिन टेस्ट घेतल्या होत्या. हॅरी पॉटरचा पहिला भाग आला तेव्हा एमा अवघ्या नऊ वर्षांची होती आणि आता नुकतीच ती 27 वर्षांची झालीय. 

Web Title: emma watson 8 time screentest