"न्यूटन' चित्रपट ऑस्करमधून बाहेर 

"न्यूटन' चित्रपट ऑस्करमधून बाहेर 

मुंबई - अभिनेता राजकुमार राव याचा "न्यूटन' हा चित्रपट "ऑस्कर'च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून अधिकृतपणे "न्यूटन'ची प्रवेशिका पाठविण्यात आली होती. 

वेगवेगळ्या भारतीय भाषांतील चित्रपटांमधून "न्यूटन' ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ऑस्करच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करण्यात आल्याने दिग्दर्शक अमित मसुरकर आणि अभिनेता राजकुमार यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र आता हा चित्रपट या स्पर्धेतून बाद झाला आहे. या चित्रपटात छत्तीसगड येथील नक्षलग्रस्त भागातील निवडणुकीवर भाष्य करण्यात आले आहे. 

ऑस्करने ट्‌विटरवरून परदेशी भाषा विभाग स्पर्धेत जागा मिळविणाऱ्या अंतिम नऊ चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत "अ फॅंटॅस्टिक वूमन', "इन द फेड', "ऑन बॉडी अँड सोल', "फॉक्‍सट्राट', "द इन्सल्ट', "लव्हलेस', "फेलिसिट', "द स्क्वायर' आणि "द वूंड' या चित्रपटांचा समावेश आहे. यातून एक चित्रपट परदेशी भाषा विभागातील ऑस्कर पटकावेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com