ई सकाळ #Live : 'उबुंटू'च्या तिकीटावर शाळकरी मुलांना 50 टक्के सवलत

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे. शाळेत गेलेल्या प्रत्येकाला आवडणारी अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे ती सहकुटुंब पाहावी यावर पुष्कर ठाम आहेच. पण त्याही पेक्षा आनंददायी बाब अशी की यंदाच्या वर्षी पुष्करला इंडस्ट्रीत येऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखी योजना जाहीर केली असून, हा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलास तिकीटात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

पुणे : पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे. शाळेत गेलेल्या प्रत्येकाला आवडणारी अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे ती सहकुटुंब पाहावी यावर पुष्कर ठाम आहेच. पण त्याही पेक्षा आनंददायी बाब अशी की यंदाच्या वर्षी पुष्करला इंडस्ट्रीत येऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखी योजना जाहीर केली असून, हा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलास तिकीटात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. रविवारी सकाळी झालेल्या ई सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि दिग्दर्शक, निर्माता पुष्कर श्रोत्री यांनी ही माहीती ई सकाळच्या वाचकांना दिली. यावेळी संगीतकार कौशल इनामदारही या लाईव्ह शोमध्ये सहभागी झाला होता. 

या लाईव्ह शोमध्ये पुष्करसह संगीतकार कौशल इनामदारही सहभागी झाला. आॅनलाईन असलेल्या अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. त्याची सविस्तर उत्तरे या दोघांनी दिली. या चित्रपटात एक प्रार्थनाही आहे. ही प्रार्थना कशी रचली गेली, त्याची चाल कशी दिली गेली यांसह श्रीरंग गोडबोले यांनी उबुंटूचा टायटल ट्रॅक कसा रचला याचाही गमतीदार किस्सा यावेळी दोघांनी सांगितला. या चॅट शोमध्ये अभिनेत्री अश्विनी भावे, सुपरस्टार अंकुश चौधरी, पुष्करची पत्नी प्रांजल यांनीही दोघांना शुभेच्छा देऊन हा आनंद द्विगुणित केला. 

उबुंटू हे नाव कसे पडले या प्रश्नापासून सुरू झालेल्या या प्रवासात अनेक प्रश्न आले पैकी काही पुढीलप्रमाणे, पुष्कर आता दिग्दर्शनच करणार का, कौशल यांनी चाली कशा बांधल्या, अनेक मराठी गीतात हिंदी भाषा वापरली जाते यावरचं दोघांचे मत काय, कौशल यांचा पुढला अल्बम कोणता येणार आहे, हा चित्रपट शूट करत असताना मुलांनी काही त्रास दिला का, शुटिंग दरम्यानचे काही किस्से असे अनेक प्रश्न वाचकांनी विचारले. त्याला दोघांनीही सविस्तर उत्तरेही दिली. त्यामुळे हा चॅट शो जवळपास 55 मिनिटे चालला. 

ई सकाळवर होणाऱ्या लाईव्ह रिव्ह्यूचेही या दोघांनी कौतुक केले. आणि आपण या रिव्ह्यूमध्ये सहभागी होऊ असेही सांगितले.