'लपाछपी' #Live रिव्ह्यू - मानवी विकृतीशी जीवघेणी लपाछपी 

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर
शुक्रवार, 14 जुलै 2017

पूजा सावंतची मुख्य भूमिका असलेला लपाछपी रिलीज झाला. 'ई सकाळ'ने पूजाच्या उपस्थितीत याचा लाईव्ह रिव्ह्यू केला. या सिनेमाला ई सकाळने दिले 3 चिअर्स

विशाल फुरिया या अमराठी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला 'लपाछपी' शुक्रवारी रिलीज झाला. या सिनेमाचा लाईव्ह रिव्ह्यू पुण्याच्या ई स्क्वेअरमधून झाला. यावेळी या सिनेमातील मुख्य अभिनेत्री पूजा सावंत हजर होती. या सिनेमाला 'ई सकाळने' दिले 3 चिअर्स. 

व्हिडीओ- लपाछपी #Live रिव्ह्यू

बऱ्याच दिवसांनी एक भयपट मराठीत आला आहे. पूजा सावंत, विक्रम गायकवाड, अनिल गवस, उषा नाईक यांनी केलेल्या कामामुळे हा सिनेमा नेटका झाला आहे. छायांकनाचा 'जर्कि' वापर आणि संगीत यामुळे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. यातून दचकायला जास्त होते. यातील काही प्रसंग मात्र निश्चित प्रशंसनीय झाले आहेत. 

पूजा सावंत या अभिनेत्रीने आपल्या खांद्यावर हे धनुष्य पेलले आहे. एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून हा चित्रपट बघायला हरकत नाही.