हृतिक शिकवणार गणिताची आकडेमोड 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

हृतिक रोशनने "काबील'नंतर आपण खूप चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं. ऍक्‍शन अन्‌ डान्सच्या पलीकडे जात त्यानं मोठ्या ताकदीनं अंध हिरोची भूमिका साकारली.

हृतिक रोशनने "काबील'नंतर आपण खूप चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं. ऍक्‍शन अन्‌ डान्सच्या पलीकडे जात त्यानं मोठ्या ताकदीनं अंध हिरोची भूमिका साकारली. त्याच्या आधीच्या "मोहेंजोदरो' आणि "बॅंग बॅंग'मध्येही तो ऍक्‍शन हिरोच होता.

हृतिकला आपल्या "ऍक्‍शन हिरो'च्या इमेजचा कंटाळा आलाय. ती बदलण्याच्या प्रयत्नात तो आहे. त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. नुकताच त्याने एक बायोपिक साईन केलाय. दिग्दर्शक विकास बहल यांच्या आगामी "सुपर 30' चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

"सुपर 30' म्हणजे पाटण्यातील गणितज्ज्ञ आनंद कुमार यांची कथा आहे; जे स्पर्धा परीक्षेसाठीसाठी विद्यार्थ्यांना तयार करतात. रामानुजन स्कूल ऑफ मॅथॅमॅटिक्‍स, असं आनंद कुमार यांच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते दर वर्षी 30 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. त्यांचा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतो.

आर्थिक स्थिती बेताची असलेले विद्यार्थी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियरिंग शिकायला येतात. इन्स्टिट्यूटमध्येच ते राहतात अन्‌ अभ्यास करतात. हृतिक आनंद कुमार यांच्या भूमिकेत आहे. सामान्य माणूस ते एक कर्तृत्ववान व्यक्तीपर्यंतचा प्रवास तो रुपेरी पडद्यावर दाखविणार आहे. आपली "ऍक्‍शन हिरो'ची इमेज डान्स अन्‌ ऍक्‍शन न करता हृतिक कशी तोडतो, हे पाहण्यासारखं असेल.