फातिमा पुन्हा आमीरसोबत 

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

मि. परफेक्‍शनिस्ट असलेल्या आमीर खानसोबत पहिला चित्रपट करण्याची संधी फार कमी जणांना मिळते; पण "दंगल गर्ल' फातिमा सना शेख हिला ती संधी मिळाली. विशेष म्हणजे तिचा दुसरा चित्रपटही आमीरसोबतच आहे.

मि. परफेक्‍शनिस्ट असलेल्या आमीर खानसोबत पहिला चित्रपट करण्याची संधी फार कमी जणांना मिळते; पण "दंगल गर्ल' फातिमा सना शेख हिला ती संधी मिळाली. विशेष म्हणजे तिचा दुसरा चित्रपटही आमीरसोबतच आहे.

ही बाब म्हणजे फातिमासाठी दुग्धशर्कराच म्हणावी लागेल. "ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा काम करणार, याची आधीपासूनच चर्चा होती; पण तिची नक्की भूमिका काय असणार, याबद्दल कोणालाच काहीच माहीत नव्हते; पण आता फातिमा "ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मि. परफेक्‍शनिस्ट आमीर खान व बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. लेखक- दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ते म्हणाले, "या चित्रपटात मुलीचा रोल खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यासाठी साजेशीच मुलगी आम्हाला शोधणे फार महत्त्वाचे होते. अनेक स्क्रिन टेस्ट आणि ऍक्‍शन वर्कशॉपनंतर आम्ही फातिमामध्ये एक खरी अभिनेत्री पाहिली. आम्हाला परफेक्‍ट अभिनेत्री मिळाल्याचा आनंद आहे.' या चित्रपटाचे चित्रीकरण 1 जूनला सुरू होणार असून पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.