आमीर, आलियाची 'फिल्मफेअर'मध्ये बाजी

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

सोनम कपूरला समिक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'निरजा' आणि 'कपूर अँड सन्स' या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी पाच पुरस्कार पटकावले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना देण्यात आला.

मुंबई - बॉक्स ऑफिस कमाईने दंगल निर्माण करणाऱ्या आमीर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली. आमीर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया भट्टला 'उडता पंजाब'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

मुंबईत शनिवारी रात्री 62 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. 'उडता पंजाब' या चिञपटात बिहारी स्थलांतरिताची भुमिका करणाऱ्या आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेञीचा पुरस्कार मिळाला. कुस्तीपटु महावीरसिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबीता यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या चित्रपटाने पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मानाच्या चारपैकी तीन पुरस्कार पटकावले. तर, दिग्दर्शक नितेश तिवारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

सोनम कपूरला समिक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'निरजा' आणि 'कपूर अँड सन्स' या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी पाच पुरस्कार पटकावले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना देण्यात आला.

विजेत्यांची संपूर्ण यादी:

 • सर्वोत्कृष्ट अॅक्शन - शाम कौशल (दंगल)
 • सर्वोत्कृष्ट संगीत - समीर उद्दीन (कपुर अँड सन्स)
 • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - अदील शेख (कर गयी चुल - कपुर अँड सन्स)
 • सर्वोत्तम वेशभूषा - पायल सलुजा (उडता पंजाब)
 • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - मितेश मिरचंदाणी (निरजा)
 • सर्वोत्कृष्ट संपादन - मनिषा आर बल्दावा (निरजा) 
 • सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण - विवेक सचिदानंद (फोबिया)
 • सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स - रेडचीली व्ही एफ एक्स (फॅन)
 • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - अपर्णा सुद (निरजा)
 • सर्वोत्कृष्ट गीत - अमिताभ भट्टाचार्या (चन्ना मेरेया (ए दिल हे मुश्किल)
 • सर्वोत्कृष्ट कथा - शकुन बत्रा आणि आयेश देवित्रे (कपुर अँड सन्स)

मनोरंजन

पुणे : डाॅ. आशुतोष जावडेकर हे नाव संगीत रसिकांना आता नवे उरलेले नाही. पेशाने डेंटिस्ट असूनही आशुतोष यांनी आपल्या संगीताचा अभ्यास...

07.36 PM

मुंबई : आपल्या वेगळ्या शैलीने अन् थाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा "बंदूक्या" हा सध्याचा बहुचर्चित चित्रपट येत्या १ सप्टेंबर...

07.18 PM

मुंबई : गेले अनेक वर्षे झी मराठीवरच्या आम्ही सारे खवय्येमधून रसिकांच्या तोंडात पाणी आणणारे अभिनेते प्रशांत दामले आता कलर्स...

03.33 PM