"गोलमाल अगेन'च्या शूटिंगला सुरुवात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

2006 मध्ये रिलीज झालेल्या "गोलमाल' चित्रपटाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्यानंतर त्याच्या आलेल्या सीरिजदेखील सुपरहिट ठरल्या. आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाची आणखीन एक सीरिज बनवतो आहे. याचे नाव आहे "गोलमाल अगेन.' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झालीय. या सिनेमात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री परिणिती चोप्रा, तबू, नील नितीन मुकेश, संजय मिश्रा, जॉनी लिवर, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत; मात्र अजय देवगण "बादशाहो' चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतला असल्यामुळे त्याने सध्या "गोलमाल अगेन'च्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाहीय.

2006 मध्ये रिलीज झालेल्या "गोलमाल' चित्रपटाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्यानंतर त्याच्या आलेल्या सीरिजदेखील सुपरहिट ठरल्या. आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाची आणखीन एक सीरिज बनवतो आहे. याचे नाव आहे "गोलमाल अगेन.' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झालीय. या सिनेमात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री परिणिती चोप्रा, तबू, नील नितीन मुकेश, संजय मिश्रा, जॉनी लिवर, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत; मात्र अजय देवगण "बादशाहो' चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतला असल्यामुळे त्याने सध्या "गोलमाल अगेन'च्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाहीय. 11 मार्चपासून अजय देवगण "गोलमाल'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे समजते आहे. 

Web Title: Golmaal Again shoot begins and Arshad Warsi, Parineeti Chopra look forward to the fun