या दिवाळीत पुन्हा एकदा 'गोलमाल' होणार

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

रोहित शेट्टीचा गोलमाल फाॅर्म्युला आता नव्याने सज्ज झाला असून, या दिवाळीत या गोलमाल अगेन या चित्रपट धमाका उडवायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज लाॅंच झाले. नेहमीप्रमाणे या चित्रपटात अजय देवगण, श्रेयस तळपदे, आर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू ही मंडळी आहेतच. शिवाय यावेळी आपल्याला दिसणार आहे परिणिती चोप्रा. 

मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल फाॅर्म्युला आता नव्याने सज्ज झाला असून, या दिवाळीत या गोलमाल अगेन या चित्रपट धमाका उडवायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज लाॅंच झाले. नेहमीप्रमाणे या चित्रपटात अजय देवगण, श्रेयस तळपदे, आर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू ही मंडळी आहेतच. शिवाय यावेळी आपल्याला दिसणार आहे परिणिती चोप्रा. 

शेट्टी यांनी या चित्रपटातून मॅड काॅमडीचा तडका पुन्हा बाॅलिवूडमध्ये आणला. एकापेक्षा एक गोलमालचे भाग काढत त्यांनी हिटचे नवे फाॅर्म्युले दिले. आता या चित्रपटातून ते नेमकी कशाप्रकारची काॅमेडी बाहेर आणत आहेत ते पाहाणे औत्सुक्याचे ठरलेले आहे. 

या एकाच दिवशी गोलमाल अगेनची तीन पोस्टर्स लाॅंच करण्यात आले आहे. ही तीनही पोस्टर्स चित्रपटातील कलाकारांनी ही पोस्टर्स रिट्विट केली आहेत. एकाचवेळी तीन पोस्टर्स लाॅंच करून या सिनेमाचा मोठा धमाका उडवून देण्याचा प्रयत्न शेट्टी आणि त्यांची टीम करते आहे.