"सरस्वती'मध्ये हरिश दुधाडे 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

"माझे मन तुझे झाले' मालिकेतून अभिनेता हरिश दुधाडेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेनंतर तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका "सरस्वती'मध्ये हरिश रणजीतच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत सरस्वती आणि राघव यांचा सुखाचा संसार सुरु होता. आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. काही वाईट काही चांगल्या. मात्र सरस्वतीने अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले. आता मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केलेय. तसेच तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली.

"माझे मन तुझे झाले' मालिकेतून अभिनेता हरिश दुधाडेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेनंतर तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका "सरस्वती'मध्ये हरिश रणजीतच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत सरस्वती आणि राघव यांचा सुखाचा संसार सुरु होता. आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. काही वाईट काही चांगल्या. मात्र सरस्वतीने अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले. आता मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केलेय. तसेच तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पण, आता अचानक राघवच्या मृत्यूमुळे सरस्वती पूर्णत: खचून गेलीय. तिला पुढे काय करावे हे कळत नाहीये आणि त्यामध्ये तिच्यावर आता कान्हाची जबाबदारीही असल्यामुळे तिला खंबीर आधाराची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये राघवच्या सावत्र भावाची म्हणजेच रणजीतची एन्ट्री होणार आहे. मालिकेमध्ये विद्युल आणि भिकू मामाच्या कारस्थानांना काही पूर्णविराम लागत नाहीये. रणजीतच्या येण्यामुळे सरस्वतीच्या आयुष्याला कलाटणी मिळेल का? हे मालिकेच्या आगामी भागात कळेल. 

Web Title: Harish Dudhade's Entry in 'Saraswati' serial