कंगनाच्या सिनेमात काम करायचंय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

बॉलीवूडचा अभिनेता इरफान खाननं आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना आपलसं केलं आहे. त्यात त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला "हिंदी मीडियम' सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरतो आहे.

बॉलीवूडचा अभिनेता इरफान खाननं आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना आपलसं केलं आहे. त्यात त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला "हिंदी मीडियम' सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतंच इरफाननं बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत "तेजू' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करीत असून, तिच्या या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळेल, अशी आशा व्यक्त केली. "हिंदी मीडियम' या चित्रपटाच्या सक्‍सेस पार्टीमध्ये इरफाननं कंगनाचं कौतुक केलं आणि म्हणाला की, "कंगना चांगली अभिनेत्री असून, ती दिग्दर्शनात पदार्पण करतेय. तिचा करिअर ग्राफ खूप चांगला आहे. तिच्या या प्रोजेक्‍टमध्ये ती मलाही संधी देईल. आता कंगनाच्या "तेजू' चित्रपटात इरफानची निवड होते का, हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागेल.'