'मिस युनिव्हर्स'ची मानकरी फ्रेंच सौंदर्यवती ईरिस

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

फ्रान्सला तब्बल 44 वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला होता. 

मनिला- सौंदर्य आणि प्रतिभेच्या कसोटीवर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मिस युनिव्हर्स' किताबाची यावर्षीची मानकरी ठरलीय फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर. 

यापूर्वी 'मिस फ्रान्स' बनलेल्या 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींवर मात करीत हा किताब पटकावला. उपविजेतेपद 25 वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअरला मिळाले, तर 23 वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 

फ्रान्सला तब्बल 44 वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला होता. 
मिस युनिव्हर्स हा किताब 1952 मध्ये सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियान मार्टेल हिने हा किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ईरिसने यंदा हा मान मिळवला. 

ईरिस म्हणाली, "मला वाटतं फ्रेंच लोकांना मिस युनिव्हर्सची गरज होती, कारण फ्रेंचांना सौंदर्य स्पर्धा आवडतात, पण 'मिस युनिव्हर्स'चा किताब न मिळाल्याने ही स्पर्धा त्यांना माहीतच नाही. आता ते 'मिस युनिव्हर्स' पाहतील."
 

मनोरंजन

मुंबई : गेस्ट इन लंडन, शादी मे जरूर आना या चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती खरबंदा आता देओल कॅम्पमध्ये दिसणार आहे. आगामी यमला पगला...

01.12 PM

मुंबई : आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत...

01.12 PM

मुंबई : किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा 'बॉईज' हा सिनेमा, प्रदर्शनापूर्वीच अधिक गाजत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट...

12.30 PM