बातमी आनंदाची... 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

गेल्या पंधरा वर्षांपासून बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरील "कौन बनेगा करोडपती' या शोमधून रसिकांना आपलंसं केलंय. हा शो बिग बींचे चाहते आवर्जून बघतात.

गेल्या पंधरा वर्षांपासून बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरील "कौन बनेगा करोडपती' या शोमधून रसिकांना आपलंसं केलंय. हा शो बिग बींचे चाहते आवर्जून बघतात.

यंदाच्या पर्वात बिग बी सूत्रसंचालन करणार नाहीत, असं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग नाराज झाला होता. अमिताभ बच्चन यांच्याकडे वेळ नसल्यामुळे दुसरं कोणीतरी या शोचं सूत्रसंचालन करणार होतं. यासाठी रणवीर कपूर, ऐश्‍वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्याशी बोलणी झाल्याची चर्चा होती; मात्र आता बिग बींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चनच करणार आहेत. या पूर्ण पर्वाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त सतरा दिवसांचा कालावधी असून ऑगस्टपासून शूटिंगला सुरुवात होणारेय. एकूण तीस भाग बिग बी करणार आहेत. मग काय, आता पुन्हा एकदा "कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी सज्ज व्हा.