जॅकलीन "जुडवा 2'मध्ये 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

"चिट्टीया कलाईयां वे...' असे म्हणत आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या खूपच चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या "जुडवा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यात ती अभिनेत्री करिश्‍मा कपूरने साकारलेली भूमिका करणार आहे. सध्या जॅकलीन या भूमिकेच्या तयारीत व्यस्त आहे. करिश्‍मासारखा अभिनय करण्यासाठी जॅकलीन तिचे चित्रपट पाहत आहे. याबाबत जॅकलीन सांगते की, "मी करिश्‍मा कपूरचे बरेच चित्रपट पाहिले. ती उत्तम अभिनेत्री आहे.

"चिट्टीया कलाईयां वे...' असे म्हणत आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या खूपच चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या "जुडवा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यात ती अभिनेत्री करिश्‍मा कपूरने साकारलेली भूमिका करणार आहे. सध्या जॅकलीन या भूमिकेच्या तयारीत व्यस्त आहे. करिश्‍मासारखा अभिनय करण्यासाठी जॅकलीन तिचे चित्रपट पाहत आहे. याबाबत जॅकलीन सांगते की, "मी करिश्‍मा कपूरचे बरेच चित्रपट पाहिले. ती उत्तम अभिनेत्री आहे. अद्याप मी त्यांच्याकडून कोणताही सल्ला घेतलेला नाही.' डेविड धवन दिग्दर्शित जुडवा चित्रपटात बॉलिवूडचा दबंग खान सलमानने डबल रोल केला होता आणि करिश्‍मा व रंभा त्याच्या नायिका दाखविल्या होत्या. आता सिक्वेलचे दिग्दर्शन डेविड धवनच करणार आहेत. "जुडवा 2'मध्ये अभिनेता वरूण धवन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तापसी पन्नू रंभाच्या भूमिकेत दिसेल.