जॅकलीनला बनायचेय बॉलीवूडची ऍक्‍शन आयकॉन 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडमधील अभिनेत्यांमध्ये ऍक्‍शनपॅक्‍ड चित्रपट करून "ऍक्‍शन हिरो'ची इमेज बनवण्याची चढाओढ लागली आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही साहसी दृश्‍ये साकारून "ऍक्‍शन आयकॉन' बनायचे आहे. ती म्हणते, "ऑनस्क्रीन ऍक्‍शन सीन करायला मला फार आवडतात. फुल टू ऍक्‍शन असलेले चित्रपट करून मला "ऍक्‍शन आयकॉन' म्हणून ओळख बनवायची आहे.' 

जॅकलीनने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "अ फ्लाइंग जाट' चित्रपटात पहिल्यांदाच काही ऍक्‍शन सीन केले होते. आता ती तिचे आगामी चित्रपट "रिलोड' व "ड्राईव्ह'मध्ये जास्त साहसी दृश्‍ये साकारताना दिसणार आहे. त्याबाबत जॅकलीन म्हणते, "ऍक्‍शन एक शानदार शैली आहे. मला अशी दृश्‍ये सहज निभावता येतात. जर मी आगामी काळात "ऍक्‍शन आयकॉन' बनू शकले तर मला खूप आनंद होईल. ऍक्‍शन चित्रपटांमध्ये नायिकांना नायकांपेक्षा जास्त वाव मिळत नाही. जर मला ऍक्‍शन पॅक्‍ड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करीन. अशा चित्रपटात काम करण्यासाठी मी एक्‍सायटेड आहे.' अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेवून ऍक्‍शनवर आधारित चित्रपट बनवायचे असल्यास निर्मात्यांनी हॉलीवूडमधून प्रेरणा घ्यायला हवी, असे मतही जॅकलीनने व्यक्त केले. 

टॅग्स

मनोरंजन

पुणे : नाटकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ई सकाळने नवा उपक्रम सुरू केला, अंक तिसरा. त्याला खूपच चांगला प्रतिसाद नाट्यसृष्टीकडून...

07.30 PM

मुंबई : डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले जाते. परंतु, आता...

03.03 PM

मुंबई : बिग बाॅसचा अकरावा सीझन आता लवकरच येणार आहे. त्याचा नुकताच टीजर लाॅंच झाला. यात मुख्य अॅंकर म्हणून सलमान खानच असणार आहे....

02.24 PM