दत्तांच्या 'पलटन'मध्ये अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, सोनू सूद

टीम ई सकाळ
रविवार, 23 जुलै 2017

मुंबई : जे.पी.दत्ता यांनी बाॅर्डर या सिनेमातून हिंदी सिनेमाला पुन्हा एकदा चांगले दिवस आणून दिले होते. या चित्रपटाला अनेक महोत्सवातून गौरवण्यात आले होते. शिवाय, याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. आता दत्ता पलटन या सिनेमाची जुळवाजुळव करत आहेत, 1962 मध्ये झालेल्या भारत आणि चीन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा होणार आहे. याच्या कलाकारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. 

या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, जॅकी श्राॅफ, जीमी शेरगिल, सोनू सूद, पुलकीत सम्राट, अर्जुन रामपाल, सिद्धार्थ कपूर, लव सिन्हा, गुरमित चौधरी अशी टीम असणार आहे. या सर्वांनाा घेऊन काही दिवसांपूर्वी दत्ता यांनी एक स्पेशल फोटोशूट केले. 

विशेष बाब अशी की या सिनेमासाठी या सर्व कलाकारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. या वर्षाखेरीस या सिनेमाचे शूट सुरू होणार असून पुढच्या वर्षी उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल असे आत्ता जाहीर करण्यात आले आहे.