'ज्युनिअर आमीर खान' अवतरणार रंगभूमीवर

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

जुनैद सध्या कासर ठाकूर पदमसी यांनी अनुवादित केलेल्या नाटकात काम करतो आहे. हे नाटक मूळ ब्रेख्तने लिहिलं असून या नाटकात जुनैद काम करतो आहे. मदर करेज अॅड हर चिल्ड्रेन असं या नाटकाचं नाव असून त्याचे चार प्रयोग ठरले आहेत.

मुंबई : खान मंडळींच्या मुलांवर चाहत्यांचा कमालीचा डोळा असतो. म्हणजे शाहरूखचा मुलगा अबराम, मुलगी सुहाना काय करते, कुठे जाते इथपासून तैमुरचं सध्या काय चाललंय हेही लाोकाना जाणून घ्यायचं असतं. यात आमीर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादही अपवाद नाही. आमीरच त्याला अनेक ठिकाणी घेऊन जात असतो. त्याचे फोटो व्हायरल होत असतात. सलमान मात्र शांत असतो. त्याच्याबद्दलच्या लग्नाच्याच बातम्या अद्याप थांबायचं नाव घेत नाहीयेत. या सगळ्यात आमीर खानच्या पहिल्या पत्नीचा रीना दत्ताचा मुलगा जुनैद मात्र कुठेत नव्हता. आता मात्र तो पापा आमीरच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजनसृष्टीत येतो आहे. पण इतर स्टारपुत्रांसारखं तो थेट सिनेमात आलेला नाही. तर त्याने त्यासाठी नाटक निवडलं आहे. त्याचा आता 19 आणि 20 आॅगस्टला प्रयोग होणार आहे. 

जुनैद सध्या कासर ठाकूर पदमसी यांनी अनुवादित केलेल्या नाटकात काम करतो आहे. हे नाटक मूळ ब्रेख्तने लिहिलं असून या नाटकात जुनैद काम करतो आहे. मदर करेज अॅड हर चिल्ड्रेन असं या नाटकाचं नाव असून त्याचे चार प्रयोग ठरले आहेत. 'जुनैद हा एक अभिनेता म्हणून नाट्यकृतीत सतत देत असतो. तो केवळ त्याचा विचार करत नाही, तर संपूर्ण नाटकाच्या टीमला आणि नाटकाला त्याचा फायदा कसा होईल याकडेही लक्ष देत असतो', असं पदमसी यांनी सांगितलं. आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या नाटकाचे चार प्रयोग मुंबईत होणार आहेत.