कंगना टोमणे मारते तेव्हा... 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

कंगना राणावत ही सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त विधानं करून तिनं अखंड चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. तिचा रंगून हा आगळावेगळा ऐतिहासिक चित्रपट येतोय आणि ती नुकतीच करण जोहरच्या "कॉफी विथ करण'मध्ये येऊन गेली. ती या शोमध्ये पहिल्यांदाच आली होती. या शोमध्ये तिने करणलाही टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. तिने शोच्या सुरुवातीपासून करणला असे काही टोमणे मारले की त्याची आणि सैफची बोलतीच बंद केली. तिने करणच्या शोबद्दलही आपली मतं सांगितली. तसंच मला कोणत्याच खानबरोबर काम करण्याची इच्छा नाही, असं तिनं सांगितलं.

कंगना राणावत ही सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त विधानं करून तिनं अखंड चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. तिचा रंगून हा आगळावेगळा ऐतिहासिक चित्रपट येतोय आणि ती नुकतीच करण जोहरच्या "कॉफी विथ करण'मध्ये येऊन गेली. ती या शोमध्ये पहिल्यांदाच आली होती. या शोमध्ये तिने करणलाही टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. तिने शोच्या सुरुवातीपासून करणला असे काही टोमणे मारले की त्याची आणि सैफची बोलतीच बंद केली. तिने करणच्या शोबद्दलही आपली मतं सांगितली. तसंच मला कोणत्याच खानबरोबर काम करण्याची इच्छा नाही, असं तिनं सांगितलं. बॉलीवूडमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडताहेत; पण त्याला मी साथ देणार नाही, असं सांगत खुलेपणानं त्यावर चर्चा केली. कंगनाचे तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असे अथक प्रयत्न चालले आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर काय इतिहास घडवतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

Web Title: kagana ranavat