हा एक अभिमानाचा क्षण- कैलाश खेर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

"अल्लाह के बंदे' या गाण्याचे स्वर 2003पासून श्रोत्यांच्या मनात कायम आहेत. या सुफी संगीताचा बाज असलेल्या गायक कैलाश खेरला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून पद्म पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये कैलाश खेर यांचे नाव आहे. 

पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर कैलाश खेरने त्याचा आनंद शब्दांत व्यक्त केला आहे. हा क्षण नक्कीच माझ्यासाठी एक अभिमानास्पद आणि आनंदाचा आहे. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कैलाश खेरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

""देवाच्या कृपेने मला हा बहुमान मिळणार आहे. हा एक नक्कीच अतिशय अभिमानाचा क्षण आहे. मी आजवर केलेले कष्ट, माझ्यासोबत असलेले आईवडिलांचे आणि गुरुंचे आशिर्वाद, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रेम यामुळेच आज हे शक्‍य झाले आहे. सध्यातरी मी माझ्या कामात व्यग्र आहे. मला जेव्हा पुरस्कार मिळाल्याचे समजले तेव्हाही मी रेकॉर्डींग करत होतो.'' असे कैलाश खेर म्हणाले. कैलाशच्या सेलिब्रेशन मात्र अजून गुलदस्त्यात आहे. 

पद्म पुरस्कारांसाठी यंदा गायक कैलाश खेरसोबतच गायिका अनुराधा पौडवाल, शेफ संजीव कपूर, क्रिकेटपटू विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

मनोरंजन

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017