काजोलचे आभार प्रदर्शन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

"व्हीआयपी-2'चा तमीळ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. त्यामध्ये काजोल आणि धनुषची धमाकेदार एन्ट्री आपल्याला दिसते. काजोलचा कॉर्पोरेट लूक खूपच छान दिसतोय. त्याचबरोबर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काजोलचे तमीळ भाषेतील संवाद...

बोलताना काजोलचा लूक एकदम कडक दिसतोय. खूपच आत्मविश्‍वासाने ती बोलतेय असं वाटतं. त्यामुळे नकळत तोंडून वा अप्रतिम हेच शब्द निघतात. यासाठी काजोलने तमीळ बोलण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी तिने अभिनेता धनुष आणि दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, "व्हीआयपी-2'मध्ये काम करताना भाषा हाच मोठा अडथळा होता; पण धनुष आणि सौंदर्यामुळे तो दूर झाला.

मी हिंदी सोडून दुसऱ्या भाषेत अभिनय करू शकेन आणि बोलू शकेन हा विश्‍वास मला त्यांनी दिला. पहिल्याच दिवशी सेटवर गेल्यावर त्यांनी दोन सीन लिहिलेलं मोठे संवाद असलेलं स्क्रीप्ट दिलं आणि म्हणाले, प्रयत्न कर तुला नक्की जमेल. या सिनेमासाठी काम करणं हा खूपच चांगला अनुभव होता. यासाठी काजोलने सौंदर्या आणि धनुषचे आभार मानले.