कंगना 80 वर्षांची! 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

ग्लॅमरस अंदाजात दिसणारी बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत आता आगामी चित्रपटात 80 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

कंगनाचा "तेजू' चित्रपट येतोय. त्यात ती चक्क जख्खड म्हातारी झालीय. विशेष म्हणजे "तेजू' चित्रपटातून कंगना दिग्दर्शन क्षेत्रात एंट्री करतेय. तिच्या ऍक्‍टिंगबद्दल तर बोलायलाच नको. आता दिग्दर्शनात ती काय झेप घेतेय ते कळेलच. आपल्या भूमिकेबाबत सांगताना कंगना म्हणाली, की "तेजू' चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे.

नेहमीच मी स्वत:ला वयापेक्षा मोठी मानत आली आहे. "तेजू'तली वृद्ध महिला खूप आनंदी अन्‌ धाडसी आहे. जी स्वत:ला वृद्ध मानतच नाही. "तेजू' अशा महिलेची कथा आहे, जी मृत्यूच्या जवळ पोहोचलीय; पण जग सोडण्यास तयार नाही... "तेजू' चित्रपटात हिमाचलमधील जीवन दाखवण्यात येणार असून तो पुढील वर्षी प्रदर्शित होईल असं बोललं जातंय. विविध भूमिका सक्षमपणे साकारणाऱ्या कंगनाला आता 80 वर्षांच्या वृद्धेच्या भूमिकेत पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.