कंगना राणावत पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाहिनीवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

"टू मॅड'चा मंच गेला "रंगून' 

"टू मॅड'चा मंच गेला "रंगून' 
मुंबई, : बॉलीवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणावतने पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाहिनीवर हजेरी लावली. तिने कलर्स मराठी वाहिनीवरील डान्स शो "2 मॅड'च्या सेटवर हजेरी लावून स्पर्धक, परीक्षक व रसिकांना सरप्राइज दिले. महाराष्ट्रातील टॅलेंट पाहून कंगना थक्क झाली. या वेळी कंगनाने आगामी चित्रपट "रंगून'चे प्रमोशन केले. "2 मॅड'मधील स्पर्धकांचा डान्स पाहून कंगना भारावून गेली. ती म्हणाली की, "या मंचावर येऊन मी खूप खूश आहे. स्पर्धक खूप टॅलेन्टेड आहेत. त्यांच्या डान्समध्ये मॅडनेस आहे. हा डान्स शो आहे आणि डान्स म्हटले की मॅडनेस हा आलाच. माझ्या मते प्रत्येक क्रिएटिव्ह कामामध्ये मॅडनेस असावाच लागतो. ' 
या शोमध्ये कंगनाने थोडीशी लावणीची झलकदेखील सादर केली. हा "रंगून' विशेष भाग 21 फेब्रुवारीला साडेनऊ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. 
 

Web Title: kangana ranaut first time marathi tv channel