कंगना शिकतेय तलवारबाजी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

कंगना राणावत सध्या तिच्या "मनकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटासाठी जोरदार तयारी करतेय. दिग्दर्शक केतन मेहता आधी कंगनाबरोबर झाशीच्या राणीवर आधारित सिनेमा करणार होते; परंतु तिने एकाच विषयावरील दुसरा चित्रपट स्वीकारल्याने मेहता यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली.

तरीही ती आपल्या चित्रपटासाठीच्या तयारीत बिझी आहे. चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारतेय. अर्थातच घोडेस्वारी अन्‌ तलवारबाजी शिकणे ओघाने आलेच. कंगनाने घोडेस्वारी शिकायला सुरुवात केलीय. आता ती तलवारबाजीचे धडे गिरवतेय. तीही थेट हॉलीवूडचे पुरस्कार विजेते स्टंट दिग्दर्शक निक पॉवेल यांच्याकडून.

निक यांनी "ब्रेव्हहार्ट', "द बॉर्न आयडेंटिटी', "रेंसिडंट एव्हिल', "रिट्रीब्युशन', "द थ्री मस्केटिअर्स', "द लास्ट समुराय' आदी ऍक्‍शनपटांसाठी हिरोंना स्टंट शिकवलेत. कंगना त्यांच्याकडूनच तलवारबाजी शिकतेय. कंगना म्हणते, "निक एक आठवडा आधीच अमेरिकेतून भारतात आले; पण मी लंडनला असल्यामुळे त्यांनी तोपर्यंत आमच्या दिग्दर्शकांबरोबर चित्रपटाचे ऍक्‍शन सीन्स समजावून घेतले.

के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी पटकथेत ऍक्‍शन सीन्स खूप बारकाईने लिहिले आहेत. मी तलवारबाजीतील हाताने केल्या जाणाऱ्या लढाईचे प्राथमिक शिक्षण घेत आहे.' सध्या कंगना निक यांच्याकडून रोज दोन तास ट्रेनिंग घेत आहे.