बेबोचं लवकरच कमबॅक 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरची तारीफ इंडस्ट्रीत होतच असते. झिरो फिगरमुळे चर्चेत आलेली बेबो सैफ अली खानशी लग्न करून वैवाहिक जीवनात रमली असली, तरी तिला आता कमबॅकचं वेध लागलं आहे. करिनाने गरोदरपणातही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. गर्भवती असतानाही तिने जाहिरातीत काम केलं होतं. तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत ती रॅम्प वॉकवर दिसली. एका वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनली. इतकंच नाही तर आता तिने आपली फिगरही मेन्टेन केलीय म्हणे. वजनही घटवलंय... करीनाच्या मते, ती कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी पुन्हा सज्ज झालीय. करीनाचा "वीरे दी वेडिंग' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरची तारीफ इंडस्ट्रीत होतच असते. झिरो फिगरमुळे चर्चेत आलेली बेबो सैफ अली खानशी लग्न करून वैवाहिक जीवनात रमली असली, तरी तिला आता कमबॅकचं वेध लागलं आहे. करिनाने गरोदरपणातही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. गर्भवती असतानाही तिने जाहिरातीत काम केलं होतं. तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत ती रॅम्प वॉकवर दिसली. एका वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनली. इतकंच नाही तर आता तिने आपली फिगरही मेन्टेन केलीय म्हणे. वजनही घटवलंय... करीनाच्या मते, ती कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी पुन्हा सज्ज झालीय. करीनाचा "वीरे दी वेडिंग' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्या चित्रपटाचं चित्रीकरण तिनं खूप आधीच केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, बेबोचा चांगला मित्र असलेला निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. एक रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन करण येतोय. दोघांमध्ये सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. करणलाही करिनाने आपल्या चित्रपटातून कमबॅक करावं, असं वाटतंय. करीनाचा होकार आला की, नायकाची निवड करण्यात येईल. याआधी बेबोनं करणच्या "कभी खुशी कभी गम', "कुर्बान', "वुई आर फॅमिली', "एक मैं और एक तू', "गोरी तेरे प्यार में' आदी चित्रपटांत काम केलंय.  
 

Web Title: kareena kapoor khan come back