'आनंदा'साठी वाट्टेल ते.. कतरिना मोरक्कोहून थेट भारतात!

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जुलै 2017

हा आनंद दुसरा तिसरा नसून आनंद एल राय हा दिग्दर्शक आहे. त्यांच्या चित्रपटात कतरिना काम करते आहे. या सिनेमातील तिची भूमिका कमालीची वेगळी आहे. म्हणून आनंद तिचे वर्कशाॅप घेणार आहेत. त्यासाठी ती दोन दिवस भारतात येणार आहे.

मुंबई : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचा कमालीचा लांबलेला जग्गा जासूस प्रदर्शित झाला पण त्याला फार कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपट रिलीज झाल्यानंतर यातील कलाकारांना फारसे मायलेज मिळाले नाही. त्यांनाही याता अंदाज होता म्हणूनच कतरिना लगेच आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटला लागली. सध्या ती सलमानसोबत 'टायगर जिंदा है'चे शूट करते आहे. मोरक्कोहून त्यांचे अबूधाबीत शूट आहे, पण तिथे जाण्यापूर्वी ती भारतात येणार आहे, तेही आनंदासाठी.

हा आनंद दुसरा तिसरा नसून आनंद एल राय हा दिग्दर्शक आहे. त्यांच्या चित्रपटात कतरिना काम करते आहे. या सिनेमातील तिची भूमिका कमालीची वेगळी आहे. म्हणून आनंद तिचे वर्कशाॅप घेणार आहेत. त्यासाठी ती दोन दिवस भारतात येणार आहे. त्यानंतर ती अबुधाबी येथे टायगर जिंदा है या सिनेमाच्या शूटला जाणार आहे. आता आनंद राय यांच्या सिनेमात तिला नेमकी कोणती भूमिका दिली गेली आहे, ते गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.