'खतरों के खिलाडी'चा थरार सुरु होणार जुलैपासून

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

खतरों के खिलाडीचा नवा सीझन आता पुन्हा येणार आहे. हा नवा सीझन जुलैैपासून सुरू होणार असून या नव्या सीझनची सर्व सूत्रे दिग्दर्शक रोहित शेट्टीकडे असणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी रोहितचा एक फोटो गुरूवारी जाहीर केला. 

मुंबई: खतरों के खिलाडीचा नवा सीझन आता पुन्हा येणार आहे. हा नवा सीझन जुलैैपासून सुरू होणार असून या नव्या सीझनची सर्व सूत्रे दिग्दर्शक रोहित शेट्टीकडे असणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी रोहितचा एक फोटो गुरूवारी जाहीर केला. 

या नव्या सीझनमध्ये 12 खेळाडू असणार आहेत. तर नेहमीपेक्षा हा सीझन आणखी खतरनाक असणार आहे. हे दर्शवणारा एक फोटो यावेळी दाखवण्यात आला. या फोटोमध्ये रोहितच्या हातात एक पट्टा असून त्याला वाघ बांधण्यात आला आहे. त्याच्या या फोटोमुळे हा नवा सीझन आणखी आक्रमक असणार असे बोलले जाते.