क्रिती - सुशांतचे गौडबंगाल! 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

"राबता' चित्रपटातील जोडी सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सनन यांच्या नात्याबद्दल अनेक महिने चर्चा सुरू आहे. सुशांतची अनेक वर्षांपासूनची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्याबरोबर ब्रेकअपही झाले. सुशांत आणि क्रिती यांच्यात जवळीक वाढल्यानेच हे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण, या दोघांनी आपण एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये नसल्याचेच जाहीर केले. भांडण आणि सुशांतच्या मूडी स्वभावामुळे दोघे एकमेकांपासून लांब राहत असल्याचेही त्यांनी सांगितले; त्यांच्या वागण्यातून मात्र तसे जाणवले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार- त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे.

"राबता' चित्रपटातील जोडी सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सनन यांच्या नात्याबद्दल अनेक महिने चर्चा सुरू आहे. सुशांतची अनेक वर्षांपासूनची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्याबरोबर ब्रेकअपही झाले. सुशांत आणि क्रिती यांच्यात जवळीक वाढल्यानेच हे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण, या दोघांनी आपण एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये नसल्याचेच जाहीर केले. भांडण आणि सुशांतच्या मूडी स्वभावामुळे दोघे एकमेकांपासून लांब राहत असल्याचेही त्यांनी सांगितले; त्यांच्या वागण्यातून मात्र तसे जाणवले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार- त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे. नुकताच सुशांत क्रितीच्या वर्सोवा येथील घरातून बाहेर पडताना दिसला, तर क्रितीही सुशांतच्या कार्टर रोड येथील घरातून बाहेर पडताना दिसली होती. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी गौडबंगाल सुरू असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Kriti Sanon spills the beans on her relationship with Sushant Singh Rajput