ई सकाळ स्पेशल: लक्ष्मीकांतची 'अशी ही बनवा बनवी'तील भूमिकाच सर्वौत्तम: अशोक सराफ

टीम ई सकाळ
रविवार, 23 जुलै 2017

खरं सांगायचे तर अशी ही बनवाबनवी हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. तेव्हा तर तो चाललाच. परंतुू आजही त्यातील धनंजय मानेची जादू कायम आहे, मला वाटते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजवरचा मला तो सर्वौत्तम परफाॅर्मन्स वाटतो, अशी पावती दिलीय खुद्द धनंजय माने अर्थात, अशोक सराफ यांनी. 

पुणे: खरं सांगायचे तर अशी ही बनवाबनवी हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. तेव्हा तर तो चाललाच. परंतुू आजही त्यातील धनंजय मानेची जादू कायम आहे, मला वाटते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजवरचा मला तो सर्वौत्तम परफाॅर्मन्स वाटतो, अशी पावती दिलीय खुद्द धनंजय माने अर्थात, अशोक सराफ यांनी. 

सध्या शेंटिमेंटल या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा अनेक माध्यमांशी बोलतायत. त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये अशोक मामा यांनी आठवणींचा हा पट उलगडला. ते म्हणाले, ''अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाचे श्रेय दिग्दर्शक सचिन यांना द्यावे लागेल. त्यावेळी हा चित्रपट धो धो चालला. शिवाय तो आजही चालतो आहे. सर्वांनीच चोख कामे केली. पण मला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजवरचा तो सर्वोत्तम परफाॅर्मन्स वाटतो. कारण, त्याने अत्यंत समजूतीने स्त्री व्यक्तिरेखा साकारली. तिचा आब राखून तरीही विनोद निर्मिती करत त्याने कमाल केली. अशी भूमिका पुन्हा त्याच्या वाट्याला आली नाही.'

या चित्रपटातील लोकप्रिय अशी धनंजय मानेंचा उल्लेखही त्यांनी केला. ते म्हणाले, 'धनंजय माने इथेच राहतात का हा संवाद इतका लोकप्रिय होईल याची कल्पना मला नव्हती. पण आजही लोक त्याचे कौतुक करतात. असे होईल असे मला वाटले नव्हते, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.