"लखनौ सेंट्रल'मध्ये रवीकिशन आणि मनोज तिवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

रवीकिशन आणि मनोज तिवारी हे दोघेही भोजपुरी सुपरस्टार. त्यांनी अनेक "हिट' चित्रपट दिलेले आहेत. दोघांचाही तेथील फॅन्स क्‍लब मोठा आहे. दोघांनीही हिंदी चित्रपटात काम केले खरे; परंतु भोजपुरी इंडस्ट्रीत त्यांना मिळालेली लोकप्रियता बॉलीवूडमध्ये काही मिळाली नाही. सध्या बॉलीवूडचा स्टार निर्माता निखिल अडवानी याने या दोघांना ब्रेक दिला आहे म्हणे. "लखनौ सेंट्रल' असे चित्रपटाचे नाव आहे. यापूर्वी हे दोघे "गंगा' या भोजपुरी चित्रपटात एकत्रित दिसले होते. आता हिंदीत पहिल्यांदाच ते एकत्र आले आहेत. नुकताच निखिलने या दोघांशी करार केला आहे. पाहूया, रवीकिशन आणि मनोज काय कमाल, धमाल करतात ते.  