रविनाच्या"मातृ'चा ट्रेलर रिलीज 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

अभिनेत्री रविना टंडन बॉलिवूड चित्रपटांमध्ये तब्बल तेरा वर्षांनी कमबॅक करत आहे. रविनाच्या "मातृ' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात रविना एका बलात्कार पीडित तरुणीच्या आईची भूमिका करताना दिसेल. ट्रेलर पाहतानाच चित्रपटात ऍक्‍शन ऍन्ड इमोशनचे स्वरुप दिसते. देशाची राजधानी आता बलात्काऱ्यांची राजधानी म्हणून प्रचलित होत आहे. महिलांसाठी असुरक्षित राजधानीतील एका घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक असून, मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्याय मागण्याऱ्या आईची व्यथा, लढा या चित्रपटात मांडला आहे. 

चित्रपटात प्रशासन योग्य दाद देत नसताना एक आई आपल्या मुलीला कसा न्याय मिळवून देते हे दिसते. इतक्‍या वर्षानंतर पुनरागमनासाठी रविनाने केलेल्या चित्रपटाची निवड अगदी योग्य असल्याचे दिसते."मातृ' चित्रपट 21 एप्रिल 2017मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्‍तर सय्यद यांनी केले आहे. 
वयाच्या 41व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणाऱ्या रविनाचा हा चित्रपट किती पसंतीस उतरेल हे बघूया. "मातृ' चित्रपटातील ट्रेलरमध्येच रविनाचा हा दमदार अभिनय पाहून मात्र प्रेक्षकांची उत्सुकता चंगलीच वाढली आहे. 
 
Web Title: Maatr Official Trailer

व्हिडीओ गॅलरी