..अन सायंकाळ बहरली जसराज, प्रियांका, अानंदीच्या सुरांनी

सौमित्र पोटे/ कॅमेरा : सुहास कद्रे
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे : समीर विद्वांस दिग्दर्शित नवा सिनेमा येत्या 11 आॅगस्टला येतोय. या सिनेमात चार गाणी आहेत. सर्वसाधारणपणे सिनेमाचा गीतकार, संगीतकार हा तसा दुर्लक्षित राहतो. पण पुण्यात गुरूवारी सायंकाळी रंगली सुरांची मैफल. आणि या मैफलीत रंग भरले जसराज जोशी, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, श्रुती आठवले आणि गीतकार वैभव जोशी यांनी. सोबतीला ह्रषिकेश दातार आणि सौरभही होते. ई सकाळच्या फेसबुक पेजवरून ही मैफल लाईव्ह एेकवण्यात आली. 

अशी रंगली आॅनलाईन मैफल..

मला काहीच प्राॅब्लेम नाही या सिनेमातील चारही गाणी या मंडळींनी गाऊन दाखवली. इतकेच नाही, तर जसराज, सौरभ आणि ऋषिकेश यांनी आपला सांगितिक प्रवासही उलगडून दाखवला. यावेळी प्रियांका, श्रुती आणि आनंदी यांनी या संगीतकार त्रिकुटाबद्दल आपले अनुभव शेअर केले.

आॅनलाईन नेटकऱ्यानीही या मैफलीला चांगली साथ दिली. विशेष बाब अशी की या चित्रपटातील अभिनेत्री स्पृहा जोशीही या आॅनलाईन मैफलीत सामील झाली.