'कर्मवीर' आमटे दाम्पत्य झळकले 'केबीसी'मध्ये

KBC
KBC

मुंबई : छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो मध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. या दाम्पत्याने 25 लाख रुपये जिंकले.

अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या दहाव्या पर्वाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आतापर्यंत केबीसीमध्ये बॉलिवूड, क्रीडा व अन्य क्षेत्रांतील व्यक्तींना बोलावण्यात आले होते. परंतु दहाव्या पर्वात समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित राहिले. खुद्द अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली होती. डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या दोन असामान्य व्यक्तींचा सहवास लाभणं ही माझ्यासाठी आनंद व सन्मानाची बाब आहे. कुणीही विचार करु शकत नाही, असं त्यांचं जीवन आणि आदिवासींसाठी केलेलं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असं काम ते करताहेत. केबीसीच्या 'कर्मवीर' भागाच्या निमित्तानं ते माझ्यासोबत होते. 

शुक्रवारी या भागाचे प्रक्षेपण केले गेले. या कार्यक्रमात आमटे दाम्पत्याच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. एक-एक प्रश्नांची उत्तरे देत अखेर 25 लाख रुपये जिंकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com