मनीष पॉलने वाटले 400 चपलांचे जोड

टीम इ सकाळ
सोमवार, 19 जून 2017

मुंबई : मनीष पॉलचा कॉमेडी सेन्स कमाल आहे. म्हणूनच सूत्रसंचालन करता करता तो एकदम स्टार झाला. सेलिब्रेटी लेबल लागल्यावरही मनीष नेहमी वेळ काढून सामाजिक कामांत भाग घेत असतो. आताही वेळातवेळ काढून मनीष दिल्लीच्या एका एनजीओत जात असतो. त्याने आपल्या मुलाचा वाढदिवसही आगळ्या पद्धतीने साजरा केला. 

आता त्याचा मुलगा दोन वर्षांचा झाला आहे. युवानच्या वाढदिनी मनीषने त्या एनजीओमध्ये जाऊन वाढदिवस साजरा केला. तिथे त्याने गरजूंना 400 चपलांच्या जोड वाटले. त्यांना खाऊही घातले. अनेकांना माहीत नसेल पण मनीषला चप्पल, बूट जमवायचा छंद आहे. त्याच्याकडे चप्पल आणि बूट मिळून तब्बल 300 जोड आहेत. 

टॅग्स