सोनम भेटणार लेखिकेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

सोनम कपूर सध्या चित्रपटांऐवजी उद्योगपती आनंद अहुजाबरोबर तिच्या होणाऱ्या लग्नासाठीच जास्त चर्चेत आहे. पण, सोनम तिच्या कामावरही तितकंच लक्ष देतेय. हेही तितकंच खरं. नुकतंच सोनमने ‘वीरे दी वेडिंग’चं चित्रीकरण पूर्ण केलंय. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणारेय. त्याचबरोबर सध्या सोनम कपूर तिच्या ‘द झोया फॅक्‍टर’ या चित्रपटावरही लक्ष केंद्रित करतेय. ‘द झोया फॅक्‍टर’ हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या ‘द झोया फॅक्‍टर’ या कादंबरीवर आधारीत आहे. एका ॲडव्हर्टाझिंग कंपनीत काम करणारी झोया सिंग सोलंकी तिच्या कामाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाला भेटते.

सोनम कपूर सध्या चित्रपटांऐवजी उद्योगपती आनंद अहुजाबरोबर तिच्या होणाऱ्या लग्नासाठीच जास्त चर्चेत आहे. पण, सोनम तिच्या कामावरही तितकंच लक्ष देतेय. हेही तितकंच खरं. नुकतंच सोनमने ‘वीरे दी वेडिंग’चं चित्रीकरण पूर्ण केलंय. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणारेय. त्याचबरोबर सध्या सोनम कपूर तिच्या ‘द झोया फॅक्‍टर’ या चित्रपटावरही लक्ष केंद्रित करतेय. ‘द झोया फॅक्‍टर’ हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या ‘द झोया फॅक्‍टर’ या कादंबरीवर आधारीत आहे. एका ॲडव्हर्टाझिंग कंपनीत काम करणारी झोया सिंग सोलंकी तिच्या कामाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाला भेटते. हळूहळू क्रिकेट टीमला झोया त्यांच्यासाठी लकीचार्म असल्याचं जाणवतं. म्हणून ते झोयाला त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी येण्याची विनंती करतात. अशी ‘द झोया फॅक्‍टर’ची थोडक्‍यात कथा आहे. सोनम या चित्रपटात झोयाची भूमिका करतेय. तिची ही भूमिका अधिक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी सोनम अनुजा चौहान यांची भेट घेणार आहे. जेणेकरून तिला ते पात्र अधिक चांगलं जाणून घेता घेईल. सोनम म्हणते, ‘मी ‘द झोया फॅक्‍टर’ हे पुस्तक वाचलं आहे आणि त्याच्या प्रेमातच पडलेय. अनुजा चौहान यांच्या लेखणीतून झोयाचं दमदार पात्र साकार झालंय. त्यामुळे त्या झोयाला जास्त चांगलं ओळखतात. चित्रीकरण पूर्ण होण्याआधी मला अनुजा यांची भेट घ्यायची आहे. जेणेकरून मी झोयाला जवळून ओळखू शकेन.’

Web Title: manoranjan news sonam kapoor