मराठी चित्रपट महामंडळाकडे पावणे नऊ लाखांचा निधी सुपूर्द

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

सध्या पुण्यात बालगंधर्व या नााट्यगृहाचा सुवर्णमहोत्सवी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी दुपारी नाट्यपरिषदेचे अध्य्रक्ष व अभिनेते मोहन जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री अलका कुबलही उपस्थित होत्या. मुलाखत संपल्यानंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यांनी मदतनिधीसाठी जमा करण्यात आलेले पावणे नऊ लाख रूपये महामंडळाचे अध्यक्ष मेधराज राजेभोसले यांच्याकडे सुपूर्द केले. 

पुणे: सध्या पुण्यात बालगंधर्व या नााट्यगृहाचा सुवर्णमहोत्सवी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी दुपारी नाट्यपरिषदेचे अध्य्रक्ष व अभिनेते मोहन जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री अलका कुबलही उपस्थित होत्या. मुलाखत संपल्यानंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यांनी मदतनिधीसाठी जमा करण्यात आलेले पावणे नऊ लाख रूपये महामंडळाचे अध्यक्ष मेधराज राजेभोसले यांच्याकडे सुपूर्द केले. 

या मदतनिधीविषयी माहिती देताना अलका कुबल आठल्ये म्हणाल्या, इंडस्ट्रीत काम करताना अनेकदा पडद्यामागील वा पडद्यावरील कलाकारांना अनेक अपघातांना समोरे जावे लागते. अशावेळी त्यांच्यापाठी भक्कम आर्थिक मदत उभी रहायला हवी. त्यासाठी मी व मोहन जोशी मिळून जिव्हाळा या संस्थेकरवी ही मदत गोळा करत होतो. आता यात पावणे नऊ लाख रूपये जमले असून ही मदत आम्ही महामंडळाकडे देत आहोत. यातून गरजूंना मदत मिळेल अशी खात्री आहे. 

या पावणे नऊ लाखांतील एक लाख रूपयांची मदत मधू कांबीकर यांनी दिली जाणार आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, कांबीकर यांची तब्येत सध्या बरी नाही. त्याचे सुपूत्र त्यांचा उपचार करायला समर्थ आहेत. पण या योजनेत कांबीकर यांनी पहीला चेक 11 हजारांचा दिला होता. अशावेळी त्यांनी काही मदत मिळायला हवी. यावर मेघराज राजेभोसले यांनीही दुजोरा दिला.