'झिरो'तून पुन्हा दिसणार श्रीदेवी...

marathi news sridevi bollywood actress zero movie shah rukh khan
marathi news sridevi bollywood actress zero movie shah rukh khan

स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनय क्षेत्राला बसलेला हा धक्का न भरुन निघणार आहे. भारताच्या या पहिल्या महिला सुपरस्टारचा शेवटचा चित्रपट म्हणजे 'झिरो'तून श्रीदेवी आपल्याला मुर्तरुपात शेवटची बघायला मिळणार आहे. 'ज्युली' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी यांनी एका नंतर एक हिट देत आपल्या चुळबुळ्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. 

2004 मध्ये दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर राहील्या. 15 वर्षांनी 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून दमदार पदार्पण करत त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर अधिराज्य गाजावले. त्यानंतर श्रीदेवी 'मॉम' या चित्रपटातून श्रीदेवी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात आणि आता शाहरुख खान स्टारर 'झिरो' चित्रपटातून त्या आपल्या भेटीला येण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालावली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटासाठी त्यांनी शूट पूर्ण केले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com