'कुलस्वामिनी', 'नकोशी' मालिकेत मराठमोळ्या सणांची मेजवानी

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

श्रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पहायला मिळणार आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीत कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी होणार आहे. तर कुलस्वामिनीमध्ये आरोहीची पहिली मंगळागौर होणार का, याची उत्सुकता आहे. 

मुंबई : श्रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पहायला मिळणार आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीत कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी होणार आहे. तर कुलस्वामिनीमध्ये आरोहीची पहिली मंगळागौर होणार का, याची उत्सुकता आहे. 

नकुशी या मालिकेतील नकुशीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे चाळीत उत्साहाचं वातावरण आहे. आता आलेली कृष्णजन्माष्टमी नकुशीसाठी जास्तच आनंददायी आहे. बग्गीवाला चाळीत सर्वच सण-उत्सव साजरे होत असतात. सर्व चाळकरी एकत्र येऊन कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी करणार आहेत. ही दहीहंडी थोडी स्पेशल होणार आहे. कारण, रणजित अर्थात उपेंद्र लिमयेचं आजवर कधीच न दिसलेलं रूप प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बग्गीवाला चाळीतली कृष्णजन्माष्टमी आणि  दहीहंडी कशी साजरी होते, त्यासाठी चाळकरी काय काय करतात, नकुशी आणि रणजित कशा पद्धतीनं त्यात सहभागी होतात हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

कुलस्वामिनी या मालिकेत लग्न करून देवधर कुटुंबात आलेली आरोही या कुटुंबाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला तिचे सासरे अच्युत देवधर यांचा पाठिंबाही आहे. मात्र, देवधर कुटुंबातल्या इतरांचा विशेषत: सुवर्णा आरोहीच्या विरोधात आहेत. कुटुंबात आरोहीचा प्रभाव वाढत असल्याने ती नाराज आहे. सुवर्णा आरोहीच्या विरोधात सतत कारस्थानंही करत आहे. आरोही राजस आणि अभय यांच्यात अडकल्यासारखी आहे. आरोहीलाही आपली मंगळागौर व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, आजवर कोणताही धार्मिक विधी न करण्याची देवधर कुटुंबाचा अट्टहास आरोहीच्या मंगळागौरीच्या रुपाने खंडित होणार का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

मनोरंजन

मुंबई : स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमनं नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि...

05.03 PM

मुंबई : सेन्साॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आता दरवेळी नवनवे खेळ खेळायला सुरूवात केली आहे. जाणूनबुजून चर्चेत...

04.24 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून 'परमाणू.. द स्टोरी आॅफ पोखरण' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही अशा...

03.36 PM