"मस्त मस्त गर्ल' कियारा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

"फगली' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये आलेली अभिनेत्री कियारा अडवानी "एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील साक्षीच्या भूमिकेमुळे सर्वपरिचित झाली.

त्यानंतर ती "मशीन' चित्रपटात झळकली. त्यातील "तू चीज बडी है मस्त मस्त...'मुळे ती जास्त लोकप्रिय झाली. आता तर म्हणे तिला लोक "मस्त मस्त गर्ल' असे म्हणतात. ती म्हणते, "जेव्हा मला लोक "मस्त मस्त गर्ल' असा आवाज देतात, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलते. माझी मुख्य भूमिका असलेल्या "मशीन' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.'  