रेडिओ सिटीवर मिका सिंग लाइव्ह 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

मिका सिंग पहिल्यांदाच रेडिओ सिटीवर लाइव्ह गाणार आहे. रेडिओ सिटीवरील "गिग सिटी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये आज (ता.16) संध्याकाळी सहा वाजता तो लाइव्ह परफॉर्म करणार आहे.

या सीझनचे सूत्रसंचालन आर. जे. सलील करणार आहे. या "गिग सिटी' सीझन-2 मध्ये गाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे मिकाने सांगितले व पुढे म्हणाला की, "हा एक वेगळा म्युझिकल शो आहे. मी अनेक वेळा लाइव्ह गायलो आहे; पण आता रेडिओ सिटीवर 5.25 करोड लोक मला लाइव्ह गाताना ऐकणार आहेत. माझ्यासाठी हा वेगळाच अनुभव ठरणार आहे. मी या सीझनमध्ये गाण्यासाठी सज्ज झालो असून हा कॉन्सर्ट तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल अशी आशा करतो.'  

टॅग्स