'वायरस'चे अनुकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

'सबसे बडा कलाकार'चे परीक्षक बोमण इराणी हे लहान कलाकारांप्रती ओढ प्रत्येक भागासोबतच वाढवत आहे. ते स्पर्धकांचे अभिनयामधील कौशल्य व विविधता पाहून ते भारावून गेले आहेत. चित्रीकरणादरम्यान बोमण इराणी यांनी नुकताच एका मजेशीर प्रसंगाचा उल्लेख केला.

ते म्हणाले, एकदा मी जावेद अख्तरला भेटलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो. एका ठिकाणी जावेदने बोमण यांना विचारले, की तुम्ही 'थ्री इडियट्‌स'मधील वायरसची भूमिका साकारताना त्याचे अनुकरण करू शकाल का? हे ऐकून स्तब्ध झालेल्या बोमण यांना काय बोलावे, हे समजतच नव्हते. त्यामुळे ते मोठ्याने हसू लागले. शेवटी, त्यांच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली.

बोमण यांनी हे गुपित लहान मुलांसमोर उघडकीस केले, तेव्हा ते म्हणाले की अथक मेहनत अन्‌ सातत्यानेच कलाकार घडत जातो.